बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस
निलेश राणेंचे राज्यसरकार,पालकमंत्री आणि आमदारांवर टीकास्त्र
तळाशिल | वैभव माणगांवकर : तळाशिल येथे सलग दुसर्यादिवशी सुरु असलेल्या बेमुदत उपोषणस्थळाला आज माजी खासदार आणि भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणेंनी भेट दिली.
ग्रामस्थांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच्या भाषणात त्यांनी तळाशिल गावच्या पक्क्या काळ्या दगडाच्या बंधार्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.
ग्रामस्थांच्यावतीने माजी सरपंच संजय केळुस्कर यांनी तो निधी नेमका कधी मिळणार असे विचारताच निलेश राणेंनी तत्परतेने उभे रहात दहा दिवसांत दहा कोटी रुपयांचा निधी दिला जाईल असे स्पष्ट केले.
येत्या दहा दिवसांत पक्क्या बंधार्यासाठी जरी निधी आला तरी जो कच्च्या व तात्पुरत्या बंधार्याचा निधी पालकमंत्री , आमदार आणि राज्यसरकारने मंजूर केलाय ते टप्प्या टप्प्याचे कामही जरुर सुरु राहून देत जेणेकरुन कोणाचे काम कोणत्या दर्जाचे आहे ते जनतेला कळेल असा टोलाही निलेश राणेंनी लगावला.
गेली अनेक वर्षे केवळ बंधारा ही एकमेव मागणी घेऊन लढणार्या तळाशिलने आता कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये असंही ते म्हणाले. कोणाच्याही आगीत तेल टाकून ती वाढवायला आपण आलो नसल्याचे त्यांनी सांगितले. अजून भरपूर कामे करायची असून केवळ विरोध करत बसण्याचा आपला उद्देश नसल्याचेही निलेश राणे यांनी सांगितले.
बोगस कामे करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला जाईल असेही माजी खासदार राणेंनी खडसावून सांगितले.