वैभववाडी | नवलराज काळे : सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री प्रकाश सखाराम काटे यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले आहे. यावेळी प्रकाश काटे यांचे बंधू उद्योजक दत्ता काटे हेही उपस्थित होते.
प्रकाश काटे हे सांगुळवाडी येथील रहिवासी आहेत. गांवच्या विकासात श्री. काटे यांचे मोठे योगदान आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी बंधू दत्ता काटे यांच्या सोबत सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून घेतले होते. आज ते भारतीय जनता पार्टीत सहभागी झाले आहेत. पक्ष प्रवेशानंतर श्री प्रकाश काटे यांच्यावर पक्षाने तालुका चिटणीस पदाची जबाबदारी सोपविली आहे. आमदार नितेश राणे यांच्या सूचनेनुसार त्यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईणकर, माजी सभापती जयेंद्र रावराणे, माजी सभापती अक्षता डाफळे, माजी सभापती अरविंद रावराणे, भाजपा जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे, प्राची तावडे, उंबर्डे सरपंच एस. एम. बोबडे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, सुनील भोगले, बाबा कोकाटे आदी उपस्थित होते.