मालवण | वैभव माणगांवकर : मालवण शहरात अगदी अल्पावधीतच सामाजीक दातृत्वाचा एक अनोखा ठसा उमटवणाऱ्या मातृत्व आधार फाऊंडेशन या संस्थेचा पहिला वर्धापनदिन अतिशय उत्साहात आणि विविध मान्यवरांचे समाज प्रबोधनात्मक विचार पसरवत पार पडला.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यानंतर ह्या संस्थेतील दिवंगत सदस्यांना एक मिनिट स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
व्यक्ती किंवा संस्था प्रामाणिकपणे आणि विश्वासाने काम करते तेव्हा लोक उदार हस्ते मदत करतात गेल्या वर्षभरात मातृत्व आधार फाउंडेशनने केलेल्या कार्याची दखल समाजाने घेतल्याने मातृत्वने समाजात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे असे प्रतिपादन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील मातृत्व आधार फाउंडेशनचा प्रथम वर्धापन दिन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रसाद देवधर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर उद्योजक दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली,कोकण सिंचन महामंडळाचे माजी अध्यक्ष साईनाथ चव्हाण, वृत्त निवेदक ऋषी देसाई, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, पुष्पलता आजगांवकर, भाई गोवेकर, सुरेश नेरुरकर, डॉ.सुभाष दिघे,डॉ.बालाजी पाटील, डॉ शशिकांत झाट्ये , चारुशीला देऊलकर, संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे, संस्थेचे अध्यक्ष आपा चव्हाण, हरी खोबरेकर, अमित इब्रापुरकर , विनोद सांडव, मालवण लायन्स क्लबचे अध्यक्ष विश्वास गांवकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष उमेश सांगोडकर ,राजन कुमठेकर, दादा वेंगुर्लेकर, प्रभूदास आजगांवकर, आदी व इतर उपस्थित होते
संस्थेचे अध्यक्ष श्री आप्पा चव्हाण यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले
यावेळी राजन तेली यांनी कोरोना काळात सर्व अडचणींवर मात करून सेवाभावी वृत्तीने समाजात ज्या मंडळीनी काम केले, आणि करताहेत त्यांची दखल घेऊन मातृत्व आधार फाउंडेशनने त्यांचा सत्कार करण्याचा उपक्रम राबविला तो स्तुत्य असल्याचे सांगितले तर दत्ता सामंत यांनी मातृत्व आधार फाऊंडेशन संस्थेचे जर आपण एकत्रित काम पाहिले तर कला, क्रीडा, सांस्कृतिक, आपत्कालीन, आरोग्य, शैक्षणिक या सर्वच क्षेत्रात आपले नाव उंचावले आहे. कोणतेही काम करत असताना सातत्य असणे फार महत्त्वाचे असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
यावेळी वृत्त निवेदक ऋषी देसाई यांनी मातृत्व आधार फाऊंडेशनने केलेला हा माझा सत्कार अत्यंत अभिमानास्पद तेव्हढाच घरचा आहे. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यातल्या मालवण व सिंधुदुर्गातील वीरांबद्दल कृतज्ञ होत त्यांच्यामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत असे भावपूर्ण उद्गार काढले.आज मातृत्व ज्या पद्धतीने तळागाळातील लोकांसाठी काम करीत आहे तसेच आपण सर्वांनी केले तर समाज प्रगती पथावर जाईल असे ते म्हणाले यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी
एखाद्याला मदत करायचीच असेल तर ती गरजू व्यक्तीला करा कारण त्यानंतर त्याच्या चेहेऱ्यावरील ते हास्य बघून ती मदत केल्याचे समाधान हे वेगळेच असते. एखादी व्यक्ती अडचणीत सापडली असेल तर मातृत्व आधार फाऊंडेशन ही संस्था त्या व्यक्तीला लगेच तिथपर्यंत पोहोचून मदत करते. या संस्थेला माझ्याजवळून लागणारे सहकार्य मी नेहमीच करेन आणि ही संस्था मातृत्व प्रेम देते त्यामुळे संकटात सापडलेली व्यक्ती समोर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी तयार असते असे ते म्हणाले.
डाॅ शशिकांत झांटये यांनी त्यांच्या मालवणी भाषेतून केलेल्या संबोधनात अनेक स्तरावरील मालवणी माणसाची तसेच त्याच्या दातृत्वाचे दाखले दिले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुणवंतांचा स्मृती चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विशेषकरून कोरोनायोद्धे, प्रामाणिक नागरीक,सफाईदूत,लोककलाकार, वगैरे विवीध समाजोपयोगी व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला.सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाविषयीचे सर्व नियम पाळून हा वर्धापनदिन साजरा झाला.
ज्येष्ठ पत्रकार श्री प्रफुल्ल देसाई यांनी उपस्थितांचे आणि कार्यक्रमाला योगदान दिलेल्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रफुल्ल देसाई, विनोद सातार्डेकर, वैद्यही जुवाटकर यांनी केले.