वैभववाडी | नवलराज काळे : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग शिक्षक संघटना शाखा वैभववाडी चा स्नेहमेळावा 2022 आयोजित करण्यात आला होता या स्नेहमेळाव्यात तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी आणि गुणवंत शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. जि. प. शाळा सांगुळवाडी नं .१ च्या पदवीधर आदर्श शिक्षिका सौ. स्नेहलता जगदीश राणे यांना सन २०२१/२२चा जिल्हा परिषद उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला यानिमित्ताने शिक्षक समितीच्या वतीने शाल श्रीफळ सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.व्यासपीठावर तालुका अध्यक्ष श्री. रफिक बोबडे ,सचिव श्री. महादेव शेट्ये ,महिला सेल अध्यक्षा सौ.दिव्या भोसले,सचिव सौ. शोभा पाटील राज्य सल्लागार श्री. सुनील चव्हाण, श्री. संतोष मोरे संचालक ,श्री. संजय पाताडे , श्री. शरद नारकर इ. मान्यवरांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले.


जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती संघटना वैभववाडी शाखेचा स्नेहमेळावा संपन्न.
72
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -