वैभववाडी | नवलराज काळे : वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडीतील श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट येथे उद्या 10 एप्रिलला रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल.
सकाळी 05:00 वाजता काकड आरती
,सकाळी 07:00 वाजता पंचामृत महाअभिषेक
,सकाळी 08:00 वाजता दैनंदिन पूजा ,सकाळी 11:00 वाजता रामजन्म व्याख्यान किर्तन
दुपारी 12:15 मिनिटांनी रामजन्मोत्सव
,दुपारी 01:15 मिनिटांनी महाआरती
,दुपारी 01:30 वाजता महाप्रसाद ,सायंकाळी 7:30 वाजता पालखी मिरवणूक ,रात्री 10:00 वाजता सातेरी प्रसादिक भजन मंडळ तळगाव खांदवाडी श्री बुवा श्याम सुंदर आचरेकर यांचे भजन दत्त प्रसादिक भजन मंडळ वाभवे तांबेवाडी बुवा विराज तांबे यांचे भजन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री अंबरनाथ राणे महाराज दत्त दरबार ट्रस्ट सांगुळवाडी च्या वतीने करण्यात आले आहे.
