चिंदर | विवेक परब : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधुन आज चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने चिंदर ग्रामपंचायत मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव व कोरोना काळात काम करणाऱ्या कोरोना योध्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत सरपंच सौ. राजश्री कोदे यांनी केले, डाँ. शामराव जाधव, मंडल अधिकारी श्री.पाटील, पंचायत समिती सदस्य अशोक बागवे, भाजप तालुका प्रमुख धोंडी चिंदरकर, सरपंच संघटना अध्यक्ष हडी सरपंच महेश मांजरेकर, कृषी अधिकारी खराडे, मनोहर(नाना) घाडी यांनी यावेळी आपले विचार मांडले. आपण प्रभात फेरी काढून लोकांच्या मनात देशभक्ती जागृत करत असू असे उद्गार मनोहर घाडी यांनी काढले तर मुलांनी आय. पी.एस् सुब्रमण्यम केळकर यांचा आदर्श ठेवावा असे विचार धोंडी चिंदरकर यांनी मांडले.
त्यानंतर अनुक्रमे डि.बी.एस परिक्षा उत्तीर्ण, दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच विशेष सत्कार आय.पी.एस् उत्तीर्ण सुभ्रमन्य केळकर, सिविल इंजिनियर उत्तीर्ण प्रथमेश तावडे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम, ग्रामरोजगार सेवक दिगंबर जाधव, उद्योजक संतोष कोदे व प्रकाश मेस्री,आदर्श अंगणवाडी सेविका मनवा चिंदरकर,यांचा करण्यात आला..
कोविड सेंन्टरला मदत करणाऱ्या शशिकांत गोलतकर,पालकरवाडी विकास मंडळ मुंबई, संदिप पारकर, गणेश गोगटे, अशोक रावराणे, विजय केनवडेकर, संतोष घाडी, मंगेश गांवकर, विजय पाताडे यांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच कोरोना योध्दा अमित घागरे व भाई तावडे, आरोग्य सेवक, सेविका, तलाठी, आशा स्वयंसेविका,शिक्षक,अंगणवाडी सेविका,मदतनिस, वायरमन, ग्रामपंचायत कर्मचारी यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, संतोष गांवकर, हिमाली अमरे,ब्रांजेल फर्नांडीस, मधुकर पाताडे,देवेद्र हडकर, ग्रामपंचायत सदस्य केदार परुळेकर, स्वरा पालकर, दुर्वा पडवळ, शशिकांत नाटेकर,जान्हवी घाडी,सानिका चिंदरकर, रिया घागरे, निलेश रेवडेकर तसेच गोपाळ लब्दे, शेखर पालकर, अजित पाडावे, दत्ता वराडकर इ. मान्यवर उपस्थित होते.