27.7 C
Mālvan
Saturday, May 10, 2025
IMG-20240531-WA0007

पाताडे मामांच्या कुटुंबियांना मालवण क्रिकेट खेळाडू व क्रिकेटप्रेमींतर्फे मदत सुपूर्द.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | विनित मंडलिक : मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडचे मुख्य क्युरेटर तथा माळी श्री पांडुरंग पाताडे ऊर्फ पाताडे मामा यांचे अकाली निधन झाले होते. त्यानंतर मालवण क्रिकेट प्रेमी,खेळाडू यांनी पाताडे मामांच्या कुटुंबियांप्रती संवेदना म्हणून एकत्रीत योगदानातून आर्थिक मदत करायचे ठरवले. ती मदत मामांच्या पत्नी आणि मुलीकडे आज 2 एप्रिलला सायंकाळी पाताडेमामांच्या वायरी येथील निवासस्थानी जाऊन दिली गेली.

यावेळी मालवण तालुक्यातील निखील परब,मंदार गावडे,प्रसाद राणे,गोविंद ऊर्फ बंटी केरकर,सुशील शेडगे ,सुयोग पंडित, वैभव सावंत यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यातील क्रिकेट खेळाडू क्रिकेटप्रेमींतर्फे पाताडे मामांच्या कुटुंबियांना सुपूर्द केली गेली. मालवण तालुक्यातील क्रिकेट समूह व गुड माॅर्निंग क्रिकेट संघ यांच्या तर्फे प्रामुख्याने या मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

पाताडे मामांच्या कुटुंबियांना अजूनही कोणी मदत करु इच्छित असेल तर श्री. निखिल परब ‘9168191957’ या गुगलपे क्रमांकावर अथवा श्री.पिंकू मोरे,मालवण यांच्याकडे जमा करायचे विनम्र व कळकळीचे आवाहन मालवण तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना,खेळाडुंना व दानशूर व्यक्ती व संस्थांना उपस्थित सर्वांनी केले आहे. ज्यांनी आत्तापर्यंत यथाशक्ती मदत केली त्यांचे आभारही पाताडे मामांच्या पत्नी व मुलीकडून मानण्यात आले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | विनित मंडलिक : मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडचे मुख्य क्युरेटर तथा माळी श्री पांडुरंग पाताडे ऊर्फ पाताडे मामा यांचे अकाली निधन झाले होते. त्यानंतर मालवण क्रिकेट प्रेमी,खेळाडू यांनी पाताडे मामांच्या कुटुंबियांप्रती संवेदना म्हणून एकत्रीत योगदानातून आर्थिक मदत करायचे ठरवले. ती मदत मामांच्या पत्नी आणि मुलीकडे आज 2 एप्रिलला सायंकाळी पाताडेमामांच्या वायरी येथील निवासस्थानी जाऊन दिली गेली.

यावेळी मालवण तालुक्यातील निखील परब,मंदार गावडे,प्रसाद राणे,गोविंद ऊर्फ बंटी केरकर,सुशील शेडगे ,सुयोग पंडित, वैभव सावंत यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यातील क्रिकेट खेळाडू क्रिकेटप्रेमींतर्फे पाताडे मामांच्या कुटुंबियांना सुपूर्द केली गेली. मालवण तालुक्यातील क्रिकेट समूह व गुड माॅर्निंग क्रिकेट संघ यांच्या तर्फे प्रामुख्याने या मदतीचे आवाहन करण्यात आले होते.

पाताडे मामांच्या कुटुंबियांना अजूनही कोणी मदत करु इच्छित असेल तर श्री. निखिल परब '9168191957' या गुगलपे क्रमांकावर अथवा श्री.पिंकू मोरे,मालवण यांच्याकडे जमा करायचे विनम्र व कळकळीचे आवाहन मालवण तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना,खेळाडुंना व दानशूर व्यक्ती व संस्थांना उपस्थित सर्वांनी केले आहे. ज्यांनी आत्तापर्यंत यथाशक्ती मदत केली त्यांचे आभारही पाताडे मामांच्या पत्नी व मुलीकडून मानण्यात आले.

error: Content is protected !!