मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे डागमोडे मंदिर येथील भवानीमातेच्या वार्षिक गोंधळ विधीनिमित्त डागमोडे येथे शुक्रवार दिनांक २५ मार्च रोजी जिल्हास्तरीय भव्य अंडरआर्म बॉक्स नाईट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रुपये 5000 द्वितीय पारितोषिक रोख रुपये 3000 व प्रत्येकी चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि शिस्तबद्ध संघ यासाठी रोख रुपयांची बक्षिसे आणि चषक प्रदान करण्यात येणार आहेत.
स्पर्धा नवतरुण मित्र मंडळ डांगमोडे आणि ग्रामस्थ यांच्या वतीने संपन्न होणार आहे. स्पर्धेसाठी कैलास वासी शिवाजी ठाकूर यांच्या स्मरणार्थ श्री संदेश ठाकूर आणि छोटू ठाकूर पुरस्कृत भव्य आकर्षक कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धा संध्याकाळी ठीक पाच वाजता सुरू होणार आहे. स्पर्धे मधील सर्व खेळाडूंची मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. .अधिक माहितीसाठी नाव नोंदणी ओंकार ठाकूर मो न..७०६६७३७३९६ आणि वेंकटेश ठाकूर मो ९४०३०७१६८२
येथे संपर्क साधावा.
यावेळी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सिने अभिनेत्री प्राजक्ता वाडये आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.. सर्व क्रीडा रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नवतरुण मित्र मंडळ डागमोडे आणि डागमोडे ग्रामस्थ केले आहे.