26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

भंडारी समाजाला ओबीसीतून वगळण्याची चूक झाल्यास परिणाम गंभीर होतील : राज राजापूरकर.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरेच्या वैभवी पेडणेकर चा भंडारी समाजरत्न पुरस्कार देऊन मुंबई येथे गौरव…

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : भंडारी समाजाला ओबीसीतुन वगळण्याची चूक करू नये, अन्यथा परिणाम गंभीर होतील, प्रसंगी समाज रस्त्यावर उतरेल. भंडारी समाज हा प्रामुख्याने कोकणच्या किनारपट्टीचा एक महत्वाचा घटक म्हणून गणला जातो. ब्रिटिश काळात जे पाहिले पोलीस दल स्थापन झाले ते सगळ्या भंडारी लोकांना घेऊन, त्याला भंडारी मलेशिया म्हणून ओळखले जाते.   कालांतराने अनेक पोटजातींमध्ये हा समाज विखुरला गेला.  त्यामुळे एकेकाळी अनेक क्षेत्रात नामवंत लोकांचे योगदान देणारा हा समाज आज विखुरलेल्या अवस्थेपर्यंत पोहचला. विखुरलेला हा समाज एक करण्यासाठीच आज या लढ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते राज राजापूरकर यांनी मुलुंड मुंबई येथे बोलताना केले.

हा समाज एक करण्यासाठी 2017 साली भंडारी जोडो अभियान राबवलेल्या श्री. जयंतराव पाटकरांनी भंडारी एकीकरण समितीच्या माध्यमातून भंडारी समाज रत्न पुरस्कार सोहळा 2022 मुलुंड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाजोपयोगी कार्य करण्यासाठी  विविध उपकेंद्रांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी भंडारी समाजाचे नांव उंचावणाऱ्या काही विशेष व्यक्तींचे भंडारी समाज रत्न पुरस्कार देऊन आणि विविध भंडारी समाज मंडळांना भंडारी समाज  गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात  आला.

यावेळी खालील मान्यवर तथा यशस्वी व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला.
१. रसिका वेंगुर्लेकर,अभिनेत्री हास्य जत्रा
२. अपूर्वा नेमळेकर,अभिनेत्री रात्रीस खेळ चाले फेम
३. राजन वाघधरे,प्रसिद्ध एडिटर/डायरेक्टर
४. सतीशचंद्र दत्तात्रय चिंदरकर,शिक्षण संस्थापक
५. डॉ श्री अमितानंद रामचंद्र आजगावकर,अस्थिव्यंग विषेशक
६. श्री रमेश राठीवडेकर, अक्षरधारा ग्रंथ यात्रा
७. शामल कमलाकर पाटकर, असिस्टंट व्हॉईस प्रेसिडेंट, डच बँक
८. कु.पूजा श्रीनिवास सुर्वे, ऑलिम्पिक जिमनॅस्टिक मेडल विनर
९. श्री प्रसन्न कांबळी,जंबो शब्दकोडे लिम्का बुक, मोदककार
१०. श्री जितेंद्र प्रभाकर आंबेरकर,उच्च शिक्षण
११. श्री नंदू आचरेकर, असोसिएट डायरेक्टर
१२. सौ ज्योती राजेश राऊत, नगरसेविका
१३. सौ सुजाता बागकर, नगरसेविका
१४. सौ विनयश्री पेडणेकर, शिक्षण क्षेत्र
१५. सौ मानसी अविनाश गवंडे, शिक्षण क्षेत्र
१६.वैभवी पेडणेकर,कला क्रीडा क्षेत्र यांचा भंडारी समाज रत्न पुरस्कार 2022 देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजक भंडारी समाजाचे नेते श्री. जयंतराव पाटकर यांनी यावेळी सांगितले की कितीही अडचणी आल्या तरीही समाजाला एकत्र बांधण्याचे काम आम्ही सर्वाना सोबत घेऊन करणार. जरी काहीजणांनी विरोध केला तरीही आज अनेक मंडळांची उपस्थिती पाहता, यापुढेही आम्ही सर्वाना विश्वासात घेऊन अनेक योजना राबवणारच. यावेळी “गाव तिथे शाखा”- या फलकाचे उदघाटन आणि भंडारी एकीकरण समितीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

यावेळी श्री. नितिन पाटील(डहाणू), श्री.शैलेश पटेल,  श्री. ऍड. स्वप्नील पाटील, योगेश मांजरेकर, मनमिळावू श्री. राजेश राऊत आणि नगरसेविका सौ. ज्योती राऊत, सौ. प्रियांका करलकर आणि फ्लोरिडा येथे वास्तव्यास असणारे श्री. करलकर आणि पत्रकार निलेश मसुरकर, दत्तप्रसाद पेडणेकर  हे कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मुलुंडचे सामाजिक कार्यकर्ते  श्री. योगेश मांजरेकर यांनी निमंत्रक म्हणून हॉल व सजावटीसाठी सहाय्य केले. तसेच एकीकरण समितीचे सदस्य श्री. शैलेश पांजरी, भाई मांजरेकर, श्री. शेखर झाड, श्री. प्रभंजन बांदवलकर यांनी विशेष मेहनत घेतली.. यावेळी भंडारी समाजाची मसुरे गावची कन्या वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिच्या आजवरच्या कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक समाजाभिमुख विविध कार्याची दखल घेऊन भंडारी समाजरत्न पुरस्कार २०२२ देऊन गौरविण्यात आले. विविध मान्यवरांनी यावेळी वैभवी च्या आतापर्यंतच्या कार्याचे विशेष कौतुक केले. भंडारी समाजरत्न पुरस्कार मिळवणारी वैभवी पेडणेकर ही सर्वात कमी वयाची भंडारी कन्या ठरली आहे.
यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी रायगड, गोवा, मुंबई, नवी मुंबई, विरार,पालघर, डहाणू येथील भंडारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरेच्या वैभवी पेडणेकर चा भंडारी समाजरत्न पुरस्कार देऊन मुंबई येथे गौरव…

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : भंडारी समाजाला ओबीसीतुन वगळण्याची चूक करू नये, अन्यथा परिणाम गंभीर होतील, प्रसंगी समाज रस्त्यावर उतरेल. भंडारी समाज हा प्रामुख्याने कोकणच्या किनारपट्टीचा एक महत्वाचा घटक म्हणून गणला जातो. ब्रिटिश काळात जे पाहिले पोलीस दल स्थापन झाले ते सगळ्या भंडारी लोकांना घेऊन, त्याला भंडारी मलेशिया म्हणून ओळखले जाते.   कालांतराने अनेक पोटजातींमध्ये हा समाज विखुरला गेला.  त्यामुळे एकेकाळी अनेक क्षेत्रात नामवंत लोकांचे योगदान देणारा हा समाज आज विखुरलेल्या अवस्थेपर्यंत पोहचला. विखुरलेला हा समाज एक करण्यासाठीच आज या लढ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असल्याचे प्रतिपादन ओबीसी नेते राज राजापूरकर यांनी मुलुंड मुंबई येथे बोलताना केले.

हा समाज एक करण्यासाठी 2017 साली भंडारी जोडो अभियान राबवलेल्या श्री. जयंतराव पाटकरांनी भंडारी एकीकरण समितीच्या माध्यमातून भंडारी समाज रत्न पुरस्कार सोहळा 2022 मुलुंड येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी समाजोपयोगी कार्य करण्यासाठी  विविध उपकेंद्रांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या वेळी भंडारी समाजाचे नांव उंचावणाऱ्या काही विशेष व्यक्तींचे भंडारी समाज रत्न पुरस्कार देऊन आणि विविध भंडारी समाज मंडळांना भंडारी समाज  गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात  आला.

यावेळी खालील मान्यवर तथा यशस्वी व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला.
१. रसिका वेंगुर्लेकर,अभिनेत्री हास्य जत्रा
२. अपूर्वा नेमळेकर,अभिनेत्री रात्रीस खेळ चाले फेम
३. राजन वाघधरे,प्रसिद्ध एडिटर/डायरेक्टर
४. सतीशचंद्र दत्तात्रय चिंदरकर,शिक्षण संस्थापक
५. डॉ श्री अमितानंद रामचंद्र आजगावकर,अस्थिव्यंग विषेशक
६. श्री रमेश राठीवडेकर, अक्षरधारा ग्रंथ यात्रा
७. शामल कमलाकर पाटकर, असिस्टंट व्हॉईस प्रेसिडेंट, डच बँक
८. कु.पूजा श्रीनिवास सुर्वे, ऑलिम्पिक जिमनॅस्टिक मेडल विनर
९. श्री प्रसन्न कांबळी,जंबो शब्दकोडे लिम्का बुक, मोदककार
१०. श्री जितेंद्र प्रभाकर आंबेरकर,उच्च शिक्षण
११. श्री नंदू आचरेकर, असोसिएट डायरेक्टर
१२. सौ ज्योती राजेश राऊत, नगरसेविका
१३. सौ सुजाता बागकर, नगरसेविका
१४. सौ विनयश्री पेडणेकर, शिक्षण क्षेत्र
१५. सौ मानसी अविनाश गवंडे, शिक्षण क्षेत्र
१६.वैभवी पेडणेकर,कला क्रीडा क्षेत्र यांचा भंडारी समाज रत्न पुरस्कार 2022 देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजक भंडारी समाजाचे नेते श्री. जयंतराव पाटकर यांनी यावेळी सांगितले की कितीही अडचणी आल्या तरीही समाजाला एकत्र बांधण्याचे काम आम्ही सर्वाना सोबत घेऊन करणार. जरी काहीजणांनी विरोध केला तरीही आज अनेक मंडळांची उपस्थिती पाहता, यापुढेही आम्ही सर्वाना विश्वासात घेऊन अनेक योजना राबवणारच. यावेळी "गाव तिथे शाखा"- या फलकाचे उदघाटन आणि भंडारी एकीकरण समितीच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

यावेळी श्री. नितिन पाटील(डहाणू), श्री.शैलेश पटेल,  श्री. ऍड. स्वप्नील पाटील, योगेश मांजरेकर, मनमिळावू श्री. राजेश राऊत आणि नगरसेविका सौ. ज्योती राऊत, सौ. प्रियांका करलकर आणि फ्लोरिडा येथे वास्तव्यास असणारे श्री. करलकर आणि पत्रकार निलेश मसुरकर, दत्तप्रसाद पेडणेकर  हे कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मुलुंडचे सामाजिक कार्यकर्ते  श्री. योगेश मांजरेकर यांनी निमंत्रक म्हणून हॉल व सजावटीसाठी सहाय्य केले. तसेच एकीकरण समितीचे सदस्य श्री. शैलेश पांजरी, भाई मांजरेकर, श्री. शेखर झाड, श्री. प्रभंजन बांदवलकर यांनी विशेष मेहनत घेतली.. यावेळी भंडारी समाजाची मसुरे गावची कन्या वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिच्या आजवरच्या कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक समाजाभिमुख विविध कार्याची दखल घेऊन भंडारी समाजरत्न पुरस्कार २०२२ देऊन गौरविण्यात आले. विविध मान्यवरांनी यावेळी वैभवी च्या आतापर्यंतच्या कार्याचे विशेष कौतुक केले. भंडारी समाजरत्न पुरस्कार मिळवणारी वैभवी पेडणेकर ही सर्वात कमी वयाची भंडारी कन्या ठरली आहे.
यावेळी सिंधुदुर्ग, रत्नागिरी रायगड, गोवा, मुंबई, नवी मुंबई, विरार,पालघर, डहाणू येथील भंडारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!