26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

‘आपली सिंधूनगरी’ ने आवाज उठविल्याने साळशी येथील शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे आश्वासन

- Advertisement -
- Advertisement -

१५ ऑगस्ट रोजी होणारे उपोषण तात्पुरते स्थगित

मात्र हे अनुदान न मिळाल्यास पुनश्च कोणत्याही क्षणी उपोषण करण्याचा निर्धार

शिरगाव |संतोष साळसकर : महाराष्ट्र शासनाच्या देवगड कृषी विभागांतर्गत चांदा ते बांदा योजनेंतर्गत “श्री”पद्धतीने भात-पीक लागवडीच्या प्रात्यक्षिकाची ६८००/-एव्हडी अनुदानापोटीची रक्कम साळशी येथील ९ शेतकऱ्यांची घेऊन त्यांना अद्याप गेली २ वर्षे त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली गेली नाही.त्याबद्दल “आपली सिंधूनगरी”ने आवाज उठविल्याने संबंधित कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्यांना दूरध्वनीव्दारे खताची रक्कम देण्याचे आश्वासन दिले.तर बाकीचे अनुदान मिळताच ते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल असे सांगितले.त्यामुळे या शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी होणारे उपोषण तात्पुरते स्थगित केले असून जर का ही रक्कम लवकर नाही जमा झाली तर पुन्हा कोणत्याही क्षणी उपोषणाला बसणार असा इशारा दिला.
साळशी येथील सुमारे ९ शेतकऱ्यांचे प्रत्येकी ६८०० रु त्यांना भात-पीक लागवडीच्या प्रात्यक्षिकाची रक्कम घेऊन त्यांना अनुदानापोटी ६३००रु त्यांच्या खात्यात जमा केले जाईल असे २वर्षापूर्वी आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांना या सर्वांना स्प्रे पपं,कोळपणी यंत्र दिले.पण ५० किलो खत दिले नव्होते.त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपली कैफियत “आपली सिंधूनगरी”कडे मांडल्यानंतर हे वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रकाश कुलकर्णी या शेतकऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क साधून खताचे पैसे देण्याचे आश्वासन दिले.आणि बाकीची अनुदानाची रक्कम वरिष्ठ पातळीवरून लवकरात लवकर कशी मिळेल आणि ती शेतकऱ्यांच्या खात्यात कशी जमा होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले.त्यामुळे आम्ही १५ऑगस्ट चे उपोषण तात्पुरते स्थगित करून जर का ही रक्कम आम्हांला लवकर मिळाली नाही तर आम्ही पुन्हा उपोषणाला बसणार.असल्याची माहिती शांताराम पांडुरंग मिराशी यांनी दिली,आणि सध्याच्या कोरोनाकाळात आम्हा शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून या आमच्या जीवनमरणाचा प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल या शेतकऱ्यांनी “आपली सिंधूनगरीचे”विशेष आभार मानले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

१५ ऑगस्ट रोजी होणारे उपोषण तात्पुरते स्थगित

मात्र हे अनुदान न मिळाल्यास पुनश्च कोणत्याही क्षणी उपोषण करण्याचा निर्धार

शिरगाव |संतोष साळसकर : महाराष्ट्र शासनाच्या देवगड कृषी विभागांतर्गत चांदा ते बांदा योजनेंतर्गत "श्री"पद्धतीने भात-पीक लागवडीच्या प्रात्यक्षिकाची ६८००/-एव्हडी अनुदानापोटीची रक्कम साळशी येथील ९ शेतकऱ्यांची घेऊन त्यांना अद्याप गेली २ वर्षे त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा केली गेली नाही.त्याबद्दल "आपली सिंधूनगरी"ने आवाज उठविल्याने संबंधित कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्यांना दूरध्वनीव्दारे खताची रक्कम देण्याचे आश्वासन दिले.तर बाकीचे अनुदान मिळताच ते त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाईल असे सांगितले.त्यामुळे या शेतकऱ्यांनी १५ ऑगस्ट रोजी होणारे उपोषण तात्पुरते स्थगित केले असून जर का ही रक्कम लवकर नाही जमा झाली तर पुन्हा कोणत्याही क्षणी उपोषणाला बसणार असा इशारा दिला.
साळशी येथील सुमारे ९ शेतकऱ्यांचे प्रत्येकी ६८०० रु त्यांना भात-पीक लागवडीच्या प्रात्यक्षिकाची रक्कम घेऊन त्यांना अनुदानापोटी ६३००रु त्यांच्या खात्यात जमा केले जाईल असे २वर्षापूर्वी आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांना या सर्वांना स्प्रे पपं,कोळपणी यंत्र दिले.पण ५० किलो खत दिले नव्होते.त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपली कैफियत "आपली सिंधूनगरी"कडे मांडल्यानंतर हे वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रकाश कुलकर्णी या शेतकऱ्यांना दूरध्वनीवर संपर्क साधून खताचे पैसे देण्याचे आश्वासन दिले.आणि बाकीची अनुदानाची रक्कम वरिष्ठ पातळीवरून लवकरात लवकर कशी मिळेल आणि ती शेतकऱ्यांच्या खात्यात कशी जमा होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे आश्वासन दिले.त्यामुळे आम्ही १५ऑगस्ट चे उपोषण तात्पुरते स्थगित करून जर का ही रक्कम आम्हांला लवकर मिळाली नाही तर आम्ही पुन्हा उपोषणाला बसणार.असल्याची माहिती शांताराम पांडुरंग मिराशी यांनी दिली,आणि सध्याच्या कोरोनाकाळात आम्हा शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून या आमच्या जीवनमरणाचा प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल या शेतकऱ्यांनी "आपली सिंधूनगरीचे"विशेष आभार मानले.

error: Content is protected !!