28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

प्राथमिक शाळा ओटव नांदगाव प्रशालेत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण व्हावे, महिला ही अबला नसून ती सबला आहे अशी जाणीव नव्या पिढीच्या मनात रुजने आवश्यक आहे. महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. येणाऱ्या काळात पुरुषप्रधान संस्कृतीत वावरताना मुलींनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे, याची सुरूवात शाळा-शाळांतून व्हावी , स्त्री पुरुष समानता हे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रूजावे असे प्रतिपादन नांदगाव मधलीवाडी प्रशालेच्या अपग्रेड मुख्याध्यापिका श्रीम.श्रावणी जावकर व श्रीम.प्रियांका भोगले यांनी प्राथमिक शाळा ओटव नं. १ येथे महिला दिन कार्यक्रम
उद्घाटनप्रसंगी केले.

यावेळी श्रीम.मानसी मोरये,शा.व्य.समिती अध्यक्षा दिप्ती परब, प्रियांका बांदिवडेकर,श्रीम.देसाई,आदि मान्यवर उपस्थित होते.
प्राथमिक शाळा ओटव नं. १ प्रशालेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून प्रशालेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थिनींनी महिलांच्या विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजिन केले होते.
यावेळी सावडाव केंद्रप्रमुख श्री. संतोष जाधव यांनी प्रशालेला सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर कर्तृत्वशाली महिलांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी ‘ प्रणाम स्त्री शक्तीला ‘ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ५०.मी.धावणे,गोळा फेक,अशा आव्हानात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. या खेळात बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन कु. सलोनी शेलार हिने केले.
मुख्याध्यापक.श्री.आनंद तांबे यांनी उपस्थितांना धन्यवाद दिले.यावेळी वैष्णवी रेडकर सर्व स्पर्धा पाडल्यानंतर आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
विजयी स्पर्धक: केसात स्ट्रॉ रोवणे १) सौ.सेजल गोसावी २) श्रीम.सुजाता माणगांवकर३) श्रीम.तनिष्का बापार्डेकर स्पर्धा क्र.२ चमचा गोटी प्रथम श्रीम.कांचन गोसावी २) श्रीम.धनश्री नार्वेकर ३) श्रीम.तनिष्का बापार्डेकर,३) श्रीम.राजेश्री गोसावी स्पर्धा क्र.३ ५० मी.धावणे १) सौ.दिप्ती परब,२) श्रीम.प्राची गोसावी ३) श्रीम.सेजल गोसावी.
स्पर्धा क्र.४ गोळा फेक:-१) श्रीम.संगिता गोसावी,२) श्रीम.दिप्ती परब,३) श्रीम.सुचिता बांदिवडेकर.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण व्हावे, महिला ही अबला नसून ती सबला आहे अशी जाणीव नव्या पिढीच्या मनात रुजने आवश्यक आहे. महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. येणाऱ्या काळात पुरुषप्रधान संस्कृतीत वावरताना मुलींनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे, याची सुरूवात शाळा-शाळांतून व्हावी , स्त्री पुरुष समानता हे मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात रूजावे असे प्रतिपादन नांदगाव मधलीवाडी प्रशालेच्या अपग्रेड मुख्याध्यापिका श्रीम.श्रावणी जावकर व श्रीम.प्रियांका भोगले यांनी प्राथमिक शाळा ओटव नं. १ येथे महिला दिन कार्यक्रम
उद्घाटनप्रसंगी केले.

यावेळी श्रीम.मानसी मोरये,शा.व्य.समिती अध्यक्षा दिप्ती परब, प्रियांका बांदिवडेकर,श्रीम.देसाई,आदि मान्यवर उपस्थित होते.
प्राथमिक शाळा ओटव नं. १ प्रशालेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून प्रशालेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थिनींनी महिलांच्या विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजिन केले होते.
यावेळी सावडाव केंद्रप्रमुख श्री. संतोष जाधव यांनी प्रशालेला सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर कर्तृत्वशाली महिलांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी ' प्रणाम स्त्री शक्तीला ' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ५०.मी.धावणे,गोळा फेक,अशा आव्हानात्मक स्पर्धा घेण्यात आल्या. या खेळात बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन कु. सलोनी शेलार हिने केले.
मुख्याध्यापक.श्री.आनंद तांबे यांनी उपस्थितांना धन्यवाद दिले.यावेळी वैष्णवी रेडकर सर्व स्पर्धा पाडल्यानंतर आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
विजयी स्पर्धक: केसात स्ट्रॉ रोवणे १) सौ.सेजल गोसावी २) श्रीम.सुजाता माणगांवकर३) श्रीम.तनिष्का बापार्डेकर स्पर्धा क्र.२ चमचा गोटी प्रथम श्रीम.कांचन गोसावी २) श्रीम.धनश्री नार्वेकर ३) श्रीम.तनिष्का बापार्डेकर,३) श्रीम.राजेश्री गोसावी स्पर्धा क्र.३ ५० मी.धावणे १) सौ.दिप्ती परब,२) श्रीम.प्राची गोसावी ३) श्रीम.सेजल गोसावी.
स्पर्धा क्र.४ गोळा फेक:-१) श्रीम.संगिता गोसावी,२) श्रीम.दिप्ती परब,३) श्रीम.सुचिता बांदिवडेकर.

error: Content is protected !!