बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदा येथील
नट वाचनालय बांदा व श्री साईबाबा भक्त सेवा मंडळ, आळवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून खास विवाहित महिलांसाठी शनिवार दिनांक १२ रोजी सायंकाळी ४ वाजता वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी ‘ऐतिहासिक व पारंपरिक’ असा विषय ठेवण्यात आला असून ही स्पर्धा येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेत संपन्न होणार आहे.
स्पर्धा बांदा शहरातील विवाहीत महिलांसाठी मर्यादित असून स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांक विजेत्या महिलांना अनुक्रमे रोख २००१, १५०१, १००१ रुपये पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच चार उत्तेजनार्थ क्रमांकाना पारितोषिक देण्यात येणार आहे. विवाहित महिलांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी वाचनालयाच्या वेळेत १० मार्चपर्यंत सौ. सुस्मिता मोरजकर-नाईक, ग्रंथपाल नट वाचनालय यांच्याकडे नावनोंदणी करावी असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.