कुणकेश्वर संघाला विजेते पद..!
वायंगणीची अक्षता सावंत ठरली मालिकावीर..!
चिंदर / विवेक परब (विशेष) : क्रिकेट या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील मर्यादीत षटकांच्या सामन्यातील पहिले द्विशतक एका महिलेने ठोकलं होतं…ती होती ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्क.
त्यानंतर तेंडुलकर,रोहीत शर्मा,गप्टील अशा पुरुषांना तसे करायचे प्रोत्साहन मिळाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही तसे घडायच्या शक्यतेचा सूर्य आता उगवलेला आहे .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातील मिठबांव येथील सिध्दार्थ स्पोर्टस् क्लब कबिर नगर येथील मैदानावर आयोजित महिला क्रिकेटच्या रणसंग्रामात मालवण तालुक्यातील वायंगणी येथील रवळनाथ क्रिकेट संघ उपविजेता ठरला.
अटीतटीच्या लढतीत कुणकेश्वर संघाला विजेते पद मिळाले. मालिकावीर म्हणून वायंगणीच्या अक्षता सावंत यांना गौरविण्यात आले.
अशा स्पर्धेमधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिकेट व महिला क्रिकेट अशा दोन स्तरांवरील प्रगतीची खेळपट्टी आणखीन मजबूत होत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे या टिम मध्ये काही खेळाडू विवाहीत आहेत.
स्पर्धेत कर्णधार म्हणून अक्षता सावंत, समृद्धी आसोलकर, तन्वी मालवणकर, अंकिता सावंत, नम्रता साळकर, सौम्या माळकर, मनिषा माळकर, तन्वी सावंत, मनस्वी नाईक, लावण्या सावंत यांचा समावेश होता.
या महिला खेळाडूंना ज्ञानदीप विद्यामंदिर चे शिक्षकवृंद यांनी अशा स्पर्धा खेळण्यासाठी उद्युक्त केल. दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच ॲड. समृद्धी आसोलकर, सचिन रेडकर, सिमा सावंत, प्रफुल्ल माळकर, पप्पी मामा, सुशांत आसोलकर, अभी सावंत, सागर राणे, प्रथमेश सावंत, सर्वेश सावंत व श्री स्वामी समर्थ (स्वामी रवळनाथ) पुरुष संघाचे पण या खेळाडूंना मोलाचे सहकार्य लाभत आहे.
या यशाबद्दल या स्पर्धेतील सर्व महिलांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.