मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : रोटरी क्लब पार्लेश्वरच्या वतीने वराड मधली वाडीतील अपंग शेतकरी योगेश सिताराम परब याला सातेरी मंदिर वराड येथे सायकलचे वितरण करण्यात आले. सदर मदतीसाठी उन्मेष सावंत यांचे मोठे सहकार्य लाभले.
यावेळी समाजसेवक राजन माणगांवकर, बॅ नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे, अशोक परब,अंकुश परब, विलास परब, नाना परब, बाबू मसूरकर,अरविंद परब, सौ अनुश्री परब उपस्थित होते.