शिरगांव / संतोष साळसकर : बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले यांच्यामार्फत शिवजयंती निमित्त आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटातून कुडाळ हायस्कूल, कुडाळ च्या कु.अलिशा अनिल पाटकर हिने तर खुल्या गटातून सावंतवाडीच्या कु.अंकिता सुहास नाईक हिने प्रथम क्रमांक मिळविला.
स्पर्धेचे हे २१ वे वर्ष होते. शालेय गटात १९ तर खुल्या गटात १२ विद्यार्थी सहभागी झाले होते.
स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय गटात द्वितीय क्रमांक कु.वरद संदेश प्रभू, लक्ष्मी नारायण विद्यालय, बिबवणे,त्रुतिय क्रमांक कु.आर्या सुयोग सातोसकर, न्यु इंग्लिश स्कूल,उभादांडा ,उत्तेजनार्थ प्रथम कु.क्रुपा उत्तम म्हाडदळकर, न्यु इंग्लिश स्कूल, उभादांडा व उत्तेजनार्थ द्वितीय कु. निल नितीन बांदेकर. केंद्र शाळा नं१ बांदा यांनी यश मिळवले
खुल्या गटात द्वितीय क्रमांक कु. नेत्रा मिलिंद गावडे, सावंतवाडी, त्रुतिय क्रमांक कु.विराज गणेश आरावंदेकर, दाभोली,उत्तेजनार्थ प्रथम कु.संजना लिलाधर रेडकर उभादांडा व उत्तेजनार्थ द्वितीय राहूल विलास वाघदरे ,घारपी ता.सावंतवाडी यांनी प्राप्त केला. शालेय गटासाठी अँड. चैतन्य दळवी व वैभव खानोलकर यांनी तर खुल्या गटासाठी अजित वसंत राऊळ व बी.टी.खडपकर यांनी परिक्षण केले.तर टाईम किपर व इतर सहकार्य कु.लविना डिसोझा, कु.मंथन देसाई व सदाशिव उर्फ बंटी सावंत यांनी काम पाहिले.खुल्या गटाचे बक्षीस वितरण प्राचार्य डॉ. विलास देऊलकर, सुरेंद्र चव्हाण. प्रा.आनंद बांदेकर, प्रा.नंदगीरीकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शालेय गटाचे बक्षीस वितरण प्रा.आरोलकर देवीदास, प्रा.विवेक चव्हाण, अजित राऊळ, बी.टी. खडपकर वैभव खानोलकर व अँड. चैतन्य दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सचिन परुळकर यांनी केले.शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर चे सचिव जयकुमार देसाई, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई व प्रशासन अधिकारी सौ.मंजिरी देसाई-मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संजय पाटील, सुनील आळवे व सचिन परूळकर यांनी प्रयत्न केले.