२० फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –
१८३५ ला आजच्या दिवशी कोलकत्ता मेडिकल कॉलेज मध्ये अधिकारारिक रित्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरु केले.
१८४६ ला इंग्रजांनी आजच्या दिवशी लाहोर वर ताबा मिळवला.
१८४७ ला घोड्यांच्या शर्यतीची संस्था रॉयल कलकत्ता टर्फ क्लब ची स्थापना करण्यात आली.
१८६८ ला बंगाल चे प्रसिद्ध वृतपत्र ‘अमृत बाजार पत्रिका’ आजच्या दिवशी सुरुवात झाली.
१९३५ ला कॅरोलीन मिकल्सेन हि पहिल्यांदा अंटार्क्टिका येथे हि पाउल ठेवणारी पहिली महिला ठरली.
१९८७ ला आजच्या दिवशी मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश हे भारताचे २३ वे आणि २४ वे राज्य बनले.
१९४७ ला तत्कालीन ब्रिटीश प्रधानमंत्री क्लीमेंट एटली यांनी भारताचे स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली.
२००९ ला संयुक्त राष्ट्र संघाने २० फेब्रुवारी ला सामजिक न्याय दिवस म्हणून साजरे करण्यास सुरुवात केली.