एस.पी.मेमोरियल ट्रस्ट, मुंबईच्यावतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त होतोय गौरव..!
शिरगांव / संतोष साळसकर : मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान लक्षात घेऊन वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ़मय मंडळाचे सदस्य तथा साहित्य दरवळ मंच मुंबई चे संस्थापक अध्यक्ष अजित वसंत राऊळ याना एस.पी. मेमोरियल ट्रस्ट मुंबई यांच्यावतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी भाषा राज्य शिक्षक २०२२ हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.या पुरस्कार सोहळ्याचे वितरण रवि.२७ फेब्रु.रोजी मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर पु. ल.देशपांडे कालाअकादमी,प्रभादेवी येथे.सायं.५ वाजता होणार आहे. ट्रॉफी,सन्मान पत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप असेल. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. अजित राऊळ यांना यापूर्वी मुंबई,लोअर परेल येथील ग.क.मार्ग मनपा माध्यमिक शाळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मनपा माध्यमिक शाळेत भाषा शिक्षक मुंबई महानगर पालिकेचा माध्यमिक शिक्षण विभागाचा आदर्श शिक्षक महापौर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.आजपर्यंत त्यांना सुमारे ८० विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.आजही ते मुंबई येथील जी. के.मार्ग शाळेच्या माजी विद्यार्थ्यांबरोबर समाजातील तळागाळातील गरजू लोकांसाठी अन्नदान,वस्त्रदान,समाजोपयोगी वस्तूचे वाटप आदी कार्यक्रमात हिरीरीने,उत्साहाने भाग घेत माजी विद्यर्थ्यांना मार्गदर्शन करतात.समाजसेवेची त्यांना खूप आवड असल्याने गावी वेंगुर्ले येथेही ते समाजकार्यात भाग घेतात.त्यांना या पुरस्काराबद्दल त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी,शिक्षकसहकाऱ्यांनी,ग्रामस्थांनी विशेष अभिनंदन केले आहे.