25.7 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आंगणेवाडीच्या मालवणी ‘टॉवर’ ची रेंज आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत..!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीचे संकेत आंगणे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या मालवणी भाषेतील ‘ टॉवर’ या शॉर्ट फिल्मला ‘काशी इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये ‘बेस्ट लॉंग शॉर्ट’ फिल्म पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
कुतुहला फिल्म्स प्रस्तुत प्रविण गंगवानी यांनी या फिल्मची निर्मिती केली आहे. तर आंगणेवाडी येथील जयेश आंगणे, देवेंद्र आंगणे, दिनेश आंगणे आणि रुचिता शिर्के यांनी अभिनयाची बाजू दमदार पणे सांभाळली आहे. यापूर्वी या शॉर्ट फिल्मला
शॉर्ट एड इंडिया आणि दहाव्या मुंबई शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये बेस्ट फिल्म ऑफ द मंथ आणि बेस्ट फिल्म ऑफ द इयर पुरस्कार, मुंबई शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये ज्युरी बेस्ट ऍक्टर पुरस्कार, मुंबई इंडिपेंडेंट फिल्म फेस्टिव्हल मध्ये बेस्ट ऍक्टर आणि बेस्ट फिल्म पुरस्कार प्राप्त झाला आहे. या शॉर्टफिल्मचे चित्रीकरण आंगणेवाडी, मसुरे, बांदिवडे, तोंडवळी, कांदळगाव, तळाणी, देऊळवाडा या ठिकाणी झाले आहे. तसेच आंगणेवाडी नाट्य मंडळ, कोंकनस्मार्ट शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स, देवेंद्र आंगणे, शेखर मराठे, सत्यजित आंगणे, ऋषी देसाई यांचे विशेष सहाय्य लाभले आहे. आंगणेवाडी मधील युवकांच्या या यशाबद्दल त्यांची कला प्रशंसा व प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीचे संकेत आंगणे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या मालवणी भाषेतील ' टॉवर' या शॉर्ट फिल्मला 'काशी इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल' मध्ये 'बेस्ट लॉंग शॉर्ट' फिल्म पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
कुतुहला फिल्म्स प्रस्तुत प्रविण गंगवानी यांनी या फिल्मची निर्मिती केली आहे. तर आंगणेवाडी येथील जयेश आंगणे, देवेंद्र आंगणे, दिनेश आंगणे आणि रुचिता शिर्के यांनी अभिनयाची बाजू दमदार पणे सांभाळली आहे. यापूर्वी या शॉर्ट फिल्मला
शॉर्ट एड इंडिया आणि दहाव्या मुंबई शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये बेस्ट फिल्म ऑफ द मंथ आणि बेस्ट फिल्म ऑफ द इयर पुरस्कार, मुंबई शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये ज्युरी बेस्ट ऍक्टर पुरस्कार, मुंबई इंडिपेंडेंट फिल्म फेस्टिव्हल मध्ये बेस्ट ऍक्टर आणि बेस्ट फिल्म पुरस्कार प्राप्त झाला आहे. या शॉर्टफिल्मचे चित्रीकरण आंगणेवाडी, मसुरे, बांदिवडे, तोंडवळी, कांदळगाव, तळाणी, देऊळवाडा या ठिकाणी झाले आहे. तसेच आंगणेवाडी नाट्य मंडळ, कोंकनस्मार्ट शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स, देवेंद्र आंगणे, शेखर मराठे, सत्यजित आंगणे, ऋषी देसाई यांचे विशेष सहाय्य लाभले आहे. आंगणेवाडी मधील युवकांच्या या यशाबद्दल त्यांची कला प्रशंसा व प्रयत्नांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!