ताज्या बातम्या
नाशिकवासियांची प्रतिक्षा संपली..! जिल्ह्यातील आरोग्य संस्थांमध्ये २७ ऑक्टोबर रोजी ‘कायाकल्प' उपक्रम. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते विद्युत रोहीत्र लोकार्पीत. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र पडताळणीचा आढावा. मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याची विभागीय स्पर्धेच्या पात्रतेची 'उंच उडी...!' सामाजिक जाणीवेसह कवी मनाचे उपक्रमशील शिक्षक मनोहर बसवंते यांचा २५ ऑक्टोबर रोजी नांदेड आकाशवाणीवर कार्यक्रम. प्रिया मयेकर यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार प्रदान. तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारींच्या निराकरणासाठी गठीत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची आढावा बैठक संपन्न. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक तालुक्यात विरंगुळा केंद्र सुरू करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. 'दुकानदारांनो सावधान...!'
तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारींच्या निराकरणासाठी गठीत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची आढावा बैठक संपन्न.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारींच्या निराकरणासाठी गठीत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची आढावा बैठक संपन्न.

तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारींच्या निराकरणासाठी गठीत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची आढावा बैठक संपन्न. 


निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांचे शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांना समन्वयाने कार्यवाहीचे निर्देश. 


सिंधुदुर्ग : तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारींचे निराकरण करून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने सहभागी करून घेण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले. तृतीयपंथीय व्यक्तींच्या समस्या व तक्रारींच्या निराकरणासाठी गठित जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीची आढावा बैठक गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

 

या बैठकीत विभागीय तृतीयपंथीय व्यक्ती हक्क संरक्षण मंडळाच्या सह - अध्यक्षा सोनाली चौकेकर यांनी तृतीयपंथीय व्यक्तींसाठी शासकीय गायरान जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर निवासी उपजिल्हाधिकारी सुकटे यांनी संबंधित विभागांनी उपलब्ध शासकीय जागांचा शोध घेऊन महसूल विभागाशी समन्वय साधावा आणि नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.

 

जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच ग्रामीण व शहरी भागांत वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथीय व्यक्तींची माहिती गोपनीयता राखून संकलित करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या माहितीच्या आधारे त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आवश्यक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.

 

श्रीकृष्ण महिला बालकल्याण व अपंग पुनर्वसन विकास मंडळ, जळगावचे सदस्य योगेश पाटील यांनी शाळा व महाविद्यालयांमध्ये तृतीयपंथीय व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या व तक्रारींबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यासाठी कार्यशाळा व जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्याची सूचना त्यांनी केली. यावर अध्यक्षांनी संबंधित यंत्रणांनी आवश्यक नियोजन करून कार्यशाळा व शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश दिले.

 

या बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा सहायक आयुक्त, समाज कल्याण संतोष चिकणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बापू शिणगारे, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी बालाजी चांदोलकर, विशेष अधिकारी तुषार गवळी यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स