तळेरे येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत उपक्रम.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील अक्षरोत्सव परिवार आणि श्रावणी कंप्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे यशस्वी चौथे वर्ष असून तीन गटात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त शालेय मुलांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मुलांना लेखनाची आणि सुंदर हस्ताक्षरची आवड निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी, १ ली ते ४ थी, ५ वी ते ८ वी व ९ वी ते १२ वी अशा तीन गटात ही स्पर्धा. होणार आहे. यासाठी सुप्रसिध्द कवी, अभिनेते आणि लेखक संकर्षण कऱ्हाडे यांच्या दोन कविता निवडण्यात आलेल्या आहेत. मुलांनी पुन्हा एकदा लेखनाकडे गांभिर्याने पहावे, हस्ताक्षर सुधारावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून मुलांना लेखनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यातून सामाजिकता जोपासली जावी असा दुहेरी उद्देश ठेऊन स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्यामुळे सामाजिक संदेश मिळेल असे साहित्य लेखनासाठी दिले जाते. यावेळच्या दोन्हीही कविता त्यात्या वयाच्या मुलांना वास्तव दर्शविणाऱ्या आहेत.
स्पर्धकांनी आपले साहित्य ‘ए फोर’ कागदवर लिहून त्यामागे स्पर्धकाचे पूर्ण नाव, पत्ता, शाळेचे पूर्ण नाव, इयत्ता, संपर्क क्रमांक लिहून दि. १५ जुलै पर्यंत निकेत पावसकर, अक्षरोत्सव, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे किंवा श्रावणी कंप्युटर एज्युकेशन, प्रज्ञांगण, महालक्ष्मी प्लाझा, खमंग हॉटेलजवळ, तळेरे, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे आणून द्यावेत किंवा पोस्टाने पाठवावेत अशी माहिती देण्यात आली आहे.
या तिनही गटातील प्रथम तीन विजेत्यांना आकर्षक सन्मानचिन्ह, सन्मानपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येईल. या स्पर्धेला उत्तम सुलेखन करणारे परीक्षक असतात. तसेच, यापूर्वी झालेल्या स्पर्धेतील काही विजेत्यांनी अद्याप आपली पारितोषिके घेऊन गेलेली नाहीत, अशा स्पर्धकांनी अवश्य संपर्क साधावा. या स्पर्धेबाबत अधिक माहिती आणि स्पर्धेच्या कवितांसाठी निकेत पावसकर 9403120156, श्रावणी मदभावे 7719858387 किंवा सतिश मदभावे 9405928865 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.