26.5 C
Mālvan
Sunday, September 8, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मागील दोन वर्षात घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांच्या माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन.

- Advertisement -
- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गेल्या दोन वर्षात राबवण्यात आलेल्या विभागाच्या विविध उपक्रमांची व योजनांच्या ‘कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आणि मंत्रिमंडळातील सर्व उपस्थित मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशाचा विकास गतीने होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अनुभवी, कार्यक्षम,सर्जनशील कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा पिढीला कौशल्य युक्त बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे.कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सर्व विभागातील अधिकारी यांना सोबत घेवून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून रोजगार निर्मिती साठी प्रभावी अंमलबजावणी केली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात ५११ प्रमोद महाजन ग्रामीण व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यासह पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. राज्यातील युवांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण होवून राज्याच्या विकासाला गती मिळेल असेही ते म्हणाले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुंबई | प्रतिनिधी: कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत गेल्या दोन वर्षात राबवण्यात आलेल्या विभागाच्या विविध उपक्रमांची व योजनांच्या 'कौशल्ययुक्त महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र' माहिती पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते आणि मंत्रिमंडळातील सर्व उपस्थित मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, देशाचा विकास गतीने होण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अनुभवी, कार्यक्षम,सर्जनशील कुशल मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा पिढीला कौशल्य युक्त बनवण्यासाठी कौशल्य विकासाच्या उपक्रमांना प्राधान्य दिले आहे.कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून सर्व विभागातील अधिकारी यांना सोबत घेवून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करून रोजगार निर्मिती साठी प्रभावी अंमलबजावणी केली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करीअर शिबिर, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, कौशल्य विद्यापीठाची स्थापना, स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी, ग्रामीण भागात ५११ प्रमोद महाजन ग्रामीण व कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यासह पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा व नमो महारोजगार मिळावे असे विविध उपक्रम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत. राज्यातील युवांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण होवून राज्याच्या विकासाला गती मिळेल असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!