
मसुरे | प्रतिनिधी : मसुरे गावचा रहिवासी विक्रम अनिरुद्ध मेहेंदळे याने एमबीबीएस प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत ५५० गुण मिळवत देशात १२,०८९ वी रॅंक प्राप्त केली आहे. विक्रम मेहंदळे याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मसुरे गावातील भरतगड इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षणासाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथे प्रवेश घेतला होता. नीट परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करून त्याने मसुरे गावाचे तसेच भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलचे नाव उंचावले आहे. त्याच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्र परिवार, संस्थाचालक, शिक्षक व मसुरेवासीयांकडून सर्वत्र कौतुक होत आहे. विक्रम मेहंदळे हा मसुरे येथील डॉ. सुधीर मेहंदळे यांचा नातू आणि डॉ. अनिरुद्ध मेहंदळे, डॉ. विणा मेहंदळे यांचा मुलगा आहे.
विक्रम मेहंदळे याच्या यशाबद्दल उद्योजक डॉ. दीपक परब, कल्याण जिल्हा भारतीय जनता पक्ष अध्यक्ष नंदू परब, माता काशीबाई महादेव मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश परब, भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे राज्य उपाध्यक्ष बाळा गोसावी, उद्योजक दीपक सावंत, शाळा कमिटीचे अध्यक्ष संग्राम प्रभू गावकर, माजी जि.प. अध्यक्ष सरोज परब, माजी उपसभापती छोटू ठाकूर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते महेश बागवे, विलास मेस्त्री, मानवता विकास परिषदचे अध्यक्ष श्रीकांत सावंत, मालवण तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर, जगदीश चव्हाण, मसुरे ग्रामस्थ, भरतगड इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व सदस्य, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.