
मसुरे | प्रतिनिधी : जागतिकीकरणाच्या युगात देशातील सर्वच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजनी आपली परिणामकारकता वाढवली पाहिजे. महाराष्ट्र हा देशाच्या औद्योगिक प्रगतीचे नेहमीच प्रतीक राहिला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय, गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी केले. मुंबई येथे गुरुवार, १९ जून रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रिज अँड ॲग्रिकल्चरच्या नव्या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर अध्यक्ष ललित गांधी यांनी सर्वांचे स्वागत केले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री मंगलप्रभात लोढा, नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहिर, चेंबर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर, चेंबर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र माणगावे, उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी, शंकर शिंदे, श्रीकृष्ण परब, रमाकांत मालू, मिलिंद गुप्ता, संजय सोनवणे, संगीता पाटील, प्रफुल्ल मालाणी आदी उपस्थित होते.