
मालवण | ब्यूरो न्यूज : देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथील रिक्षा आणि एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातत आचरा येथील मृत्यूमुखी पडलेल्या संकेत सदानंद घाडी (वय ३५, आचरा वरचीवाडी), संतोष रामजी गावकर (वय ३५, आचरा गाऊडवाडी), रोहन मोहन नाईक (वय ३५, आचरा गाऊडवाडी) आणि सोनू कोळंबकर (वय ४५, आचरा पिरावाडी) यांना मालवण तालुका भाजपच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, विलास हडकर, शहर मंडळ अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, महेश मांजरेकर, आप्पा लुडबे, विजय निकम, संतोष गावकर, दीपक सुर्वे, ललित चव्हाण, अभी गावडे, रविंद्र घागरे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. तो वाढदिवस भाजपा कार्यालयात साजरा होणार होता. मात्र आपल्या तालुक्यातील तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान या घटनेमुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय धोंडी चिंदरकर यांनी घेतला.