पत्रकार प्रशांत हिंदळेकर यांच्या मातोश्री होत.

मालवण | ब्यूरो न्यूज : शहरातील भरड येथील रहिवासी सौ. स्वाती विलास हिंदळेकर (वय ६७) यांचे २३ मे रोजी रात्री निधन झाले. शनिवारी २४ मे रोजी सकाळी दांडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पती, तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मालवणचे पत्रकार प्रशांत हिंदळेकर व साईश्रद्धा मोबाईल शॉपीचे मालक दीपक हिंदळेकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.