पत्रकार अमोल टेंबकर यांचे वडिल.

सावंतवाडी | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष, पत्रकार अमोल टेंबकर यांचे वडिल मंगेश अंकुश टेंबकर यांचे शुक्रवार, २३ मे रोजी रात्री ८ वाजता न्यू सालईवाडा, मोरडोंगरी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.
मंगेश टेंबकर यांच्या पश्चात तीन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे. पत्रकार अमोल टेंबकर, प्रसाद टेंबकर आणि गॅरेज व्यावसायिक सुरज टेंबकर यांचे ते वडिल होत. सालईवाडा आयटीआय परिसरात त्यांचे ‘श्री समर्थ सायकल स्टोअर्स’ नावाचे गॅरेज होते, जिथे ते सायकल दुरुस्ती आणि भाड्याने देण्याचा व्यवसाय करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे.