तोंडवळी – तळाशील रस्त्याचे काम मार्गी.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा स्थानिकांच्या वतीने कृतज्ञतापूर्वक सत्कार.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातल्या तोंडवळी फाटा ते तळाशील वाडी या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली होती. याबाबत स्थानिकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे लक्ष वेधले होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी १५ मे २०२५ पूर्वी रस्त्याचे काम मार्गी लावू असा धीर देत, स्थानिकांना आश्वस्त केले होते . त्यानुसार या रस्त्याचे काम मार्गी लावण्यात आले आहे. याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत सामंत यांचा सत्कार केला आणि आभार मानले.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आपण विकास कामांसाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणे, जयप्रकाश परुळेकर, सरपंच आचरा जेरॉन फर्नांडिस, डॉ. प्रमोद कोळंबकर, सरपंच तोंडवळी नेहा तोंडवळकर, माजी सरपंच आबा कांदळकर, संजय केळुसकर, सदस्य भूपाल मालंडकर, अनन्या पाटील, सुजाता पाटील, गणेश तोंडवळकर, संजय तारी, श्रीकृष्ण रेवंडकर, विश्वनाथ खवणेकर, विजय पाटील, कल्पेश नाईक, संजय पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते.