आम्ही मालवणीच्या वतीने साहित्यिक उपक्रमात नितीन वाळके यांचा कथा वाचनाचा कार्यक्रम.
पर्यटकांनी केली उपक्रमाची विशेष प्रशंसा.

मालवण | प्रतिनिधी : अभियान आम्ही मालवणीच्या वतीने ‘चला वाचू आनंदे! मावळत्या दिनकराच्या साक्षीने…’ साहित्यिक उपक्रमांतर्गत १५ मे रोजी राॅक गार्डन, मालवण येथे सहाव्या पुष्पात नितीन वाळके यांच्या कथा वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी वाळके यांनी लेखक रवि आमले लिखित ‘राॅ भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा’ या पुस्तकातील कथांचे वाचन केले. पुस्तकातील ‘राॅ’ या च्या कार्यपद्धती, ऐतिहासिक घटनांमधील सहभाग आणि मिशनमधील गूढतेवर प्रकाश टाकणाऱ्या कथांमधील निवडक वेच्यांचे वाचन केले.
यावेळी आम्ही मालवणीच्या वतीने कवी रुजारिओ पिंटो, ज्येष्ठ साहित्यिका वैशाली पंडित, सुनील परुळेकर, सतिश काजरेकर तसेच साहित्यप्रेमी व नागरिक, पर्यटक उपस्थित होते.
पर्यटकांनी आम्ही मालवणीच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या या साहित्यिक उपक्रमाची विशेष प्रशंसा केली.