आ. निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले स्वागत.
मालवण | ब्यूरो न्यूज : देवली ग्रामपंचायत येथील गाव विकास पॅनल व उबाठा सदस्य यांनी गाव विकासाच्या दृष्टीने आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश केला अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उपसरपंच हेमंत चव्हाण, सदस्य गणेश आचरेकर, दीपीका सारंग, रुपल आचरेकर, मेघा पाटकर, नवनाथ झोरे, गुरु चव्हाण यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, रामू चव्हाण, बाबू चव्हाण, मंदार लुडबे, शाम मेस्त्री, महादेव चव्हाण, भाऊ चव्हाण, वैभव चव्हाण, सूर्या चव्हाण, दादा आचरेकर, मनिष पाटकर, बबलू चव्हाण, समीर वेतुरेकर, भाऊ मोरजे यांसह अन्य उपस्थित होते.