मालवण | प्रतिनिधी : शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक तसेच धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या २६८ व्या जयंतीनिमित्त, मालवण कुंभारमाठ सकल हिंदू समाजातर्फे उत्साहात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

श्री स्वयंभू मंदिर कुंभारमाठ येथून मोटर सायकल रॅलीची सुरुवात झाली. मालवण शहर बाजारपेठ मार्गे पुन्हा कुंभारमाठ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी रॅली आली. यावेळी शिवभक्त भूषण साटम यांनी, छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी, ‘सिंदूर मिशन’ मध्ये पाकिस्तान विरुद्ध केलेल्या कामगिरीबद्दल भारतीय सैनिकांची कृतज्ञता व्यक्त करण्यात आली अशी माहिती शिवभक्त भाऊ सामंत यांनी दिली आहे.