पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील मालोंड बेलाचीवाडी येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते विजय भाऊ घाडीगावकर (६५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री राहत्या घरी निधन झाले. यानंतर विजय घाडीगावकर यांच्या पत्नी श्रीमती. विमल विजय घाडीगावकर (५८ वर्षे) यांची प्रकृती अत्यवस्थ होऊन बुधवारी रात्री राहत्या घरी निधन झाले. चार दिवसांच्या फरकाने पती-पत्नीचे निधन झाल्याने मालोंड बेलाचीवाडी येते हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई येथे राहणारे विजय घाडीगावकर हे मागील काही वर्षे आपल्या गावी मालोंड बेलाचीवाडी येथे नातेवाईकांसह राहत होते. ते या परिसरात सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, भाऊ, भावजई, बहिणी, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. तर श्रीमती विमल यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, दिर, जाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे. येथील बाबू उर्फ कांता घाडीगावकर यांचे ते भावोजी तर विराज घाडीगावकर यांचे ते आई – वडिल होत.