प्रतिनिधी : युवा बुवांनी पंचम स्वरसम्राट व भजनकार गुरूवर्य विजय परब यांचा आदर्श ठेवावा व अशा रत्नाकडून शिकवण घ्यावी असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी कासार्डे येथे केले. कासार्डे कराळे हाॅल येथे आयोजीत पंचम स्वरसम्राट व भजनकार विजय परब यांच्या (७५ व्या ) अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. बुधवार १ जानेवारी २०२४ रोजी गुरूवर्य विजय परब यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे यांनी प्रमुख उपस्थित राहून गुरुवर्य परब बुवांना शुभेच्छा दिल्या.
![](https://aaplisindhunagari.com/wp-content/uploads/2025/01/IMG_20250102_135944-COLLAGE.jpg)
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह श्रीधर मुणगेकर, रामदास कासले, प्रमोद हरयाण, बुवा भालचंद्र केळुस्कर, चिले बुवा, प्रकाश पारकर, पाळेकर बुवा, शिरसाठ बुवा, लक्ष्मण गुरव, गुंडू सावंत, लोके बुवा तसेच भजन क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर व गुरूवर्य विजय परब बुवांचे शिष्य आणि भजनप्रेमी चाहते उपस्थित होते.