मसुरे | प्रतिनिधी : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे ३ डिसेंबर २०२४ ते सन २०२५ या वर्षामध्ये होणाऱ्या आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या श्रीदेवी भराडी मातेच्या उत्सवा पर्यंत, मंदिरात चालू असलेल्या धार्मिक विधींमुळे ओटी भरणे, साडी चोळी (खण), नारळ (श्रीफळ) ठेवणे, नवस फेडणे, गोड पदार्थ ठेवणे, गाऱ्हाणी घालणे, इत्यादी सर्व विधी बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे वरील दर्शविलेले कोणतेही पूजा विधी साहित्य किंवा नवस फेडीचे साहित्य कृपया भाविकांनी मंदिरात दर्शनास येताना आणू नये. त्याचा स्वीकार मंदिरात केला जाणार नाही. आई भराडी मातेच्या दर्शनास येणाऱ्या भाविकांनी याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आंगणेवाडी श्री देवी भराडी मंदिर येथे ३ डिसेंबर पासून ओटी भरण्याचा विधी वार्षिकोत्सवा पर्यंत बंद.
142
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -