सलग चौथ्या वेळी महाराष्ट्र सदस्यपदी बिनविरोध निवडून यायचा मान.
मालवण | प्रतिनिधी : अखिल भारतीय कोंकणी परीषदेची नूतन कार्यकारी जाहिर झाली असून त्यामध्ये मालवणचे प्रतिथयश कवी तथा साहित्यिक श्री. रुजारीओ पिंटो यांना ‘महाराष्ट्र सदस्य’ म्हणून सलग चौथ्या वेळी बिनविरोध निवडून यायचा मान मिळाला आहे. १ डिसेंबर रोजी कोंकणी भाषा मंडळ, मडगांव गोवा येथे झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीचा कालावधी २०२४ ते २०२६ असा असून ती कार्यकारिणी खालील प्रमाणे आहे.
फादर मोईझिन द आताईद ( अध्यक्ष ), हेमा नायक ( उपाध्यक्ष) चेतन आचार्य ( कार्याध्यक्ष), टायटस नोरोन्हा ( उपकार्याध्यक्ष (कर्नाटक), रुजारिओ पिन्टो (महाराष्ट्र), पि एम कृष्णा (केरळ),
सरकार्यदर्शी – स्नेहा सबनीस, जोड कार्यदर्शी- फिलोमीना सांफ्रांसिस्को, भांडारी – हेन्री पेरनाल, सभासद – अनंत अग्नी, अरवींद बार्देशकार, राकेश मिनेझीस.
साहित्यिक रुजारीओ पिंटो यांच्या सलग चौथ्यांदा झालेल्या निवडीबद्दल त्यांचे साहित्य वर्तुळातून अभिनंदन होत आहे.