25.3 C
Mālvan
Saturday, January 18, 2025
IMG-20240531-WA0007

ओल्ड गोवा येथे फेस्त उत्सवात जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सिंधू मित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान पदयात्रेने गोव्यात.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण, ओरोस, सावंतवाडी, मडुरामार्गे, सातार्डा, ओल्ड गोवा अशी पदयात्रा.

यात्रेकरुंनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचे मानले आभार.

सावंतवाडी | प्रतिनिधी : ओल्ड गोवा येथील फेस्त उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या दहा वर्षाप्रमाणे यंदाही भल्या पहाटे गोवा गाठले. या पदयात्रेदरम्यान कोलवाळ येथील चॅपेलमध्ये जिल्ह्यातील सर्व पदयात्रेकरूंसाठी नाष्टा व चहाची व्यवस्था केली. तसेच या पदयात्रेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी ‘राष्ट्र प्रथम’ हे अभियान राबवताना त्याचे महत्त्व स्पष्ट करून याबाबतच्या पत्रकांचे यात्रेकरूंना वितरण केले.

ओल्ड गोवा येथील दरवर्षी ३ डिसेंबरच्या सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त उत्सवासाठी सिंधुदुर्गातील शेकडो ख्रिस्ती बांधव भाविक चार दिवसांची पदयात्रा करीत सहभागी होत असतात. ही पदयात्रा मालवण, ओरोस, सावंतवाडी, मडुरामार्गे सातार्डाला पोहोचून ओल्ड गोव्याला जाते. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने २०१३ पासून गोव्यात जाऊन या सर्व यात्रेकरूंच्या चहा पाणी, नाश्त्याची व्यवस्था करून त्यांचे विविध विषयावर प्रबोधन केले जाते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पदयात्रेकरूंच्या वतीने इलियास फर्नाडिस, फादर थॉमस फर्नांडिस, बेनी डिसोजा, जोसेफ पॉल यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधिलकीचे आभार मानले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी ‘प्रथम राष्ट्र’ या जनजागरण अभियानाबाबत मार्गदर्शन करताना राष्ट्र प्रथम का असले पाहिजे आणि देशसेवा का करावी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ विशाल पाटील, भार्गवराम शिरोडकर, भगवान रेडकर, आनंद मेस्त्री, संतोष नाईक विनय वाडकर, दीपक गावकर, नितीन गोंडगिरे, सिद्धेश मणेरीकर उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण, ओरोस, सावंतवाडी, मडुरामार्गे, सातार्डा, ओल्ड गोवा अशी पदयात्रा.

यात्रेकरुंनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचे मानले आभार.

सावंतवाडी | प्रतिनिधी : ओल्ड गोवा येथील फेस्त उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या दहा वर्षाप्रमाणे यंदाही भल्या पहाटे गोवा गाठले. या पदयात्रेदरम्यान कोलवाळ येथील चॅपेलमध्ये जिल्ह्यातील सर्व पदयात्रेकरूंसाठी नाष्टा व चहाची व्यवस्था केली. तसेच या पदयात्रेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी 'राष्ट्र प्रथम' हे अभियान राबवताना त्याचे महत्त्व स्पष्ट करून याबाबतच्या पत्रकांचे यात्रेकरूंना वितरण केले.

ओल्ड गोवा येथील दरवर्षी ३ डिसेंबरच्या सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त उत्सवासाठी सिंधुदुर्गातील शेकडो ख्रिस्ती बांधव भाविक चार दिवसांची पदयात्रा करीत सहभागी होत असतात. ही पदयात्रा मालवण, ओरोस, सावंतवाडी, मडुरामार्गे सातार्डाला पोहोचून ओल्ड गोव्याला जाते. सिंधुमित्र प्रतिष्ठानच्यावतीने २०१३ पासून गोव्यात जाऊन या सर्व यात्रेकरूंच्या चहा पाणी, नाश्त्याची व्यवस्था करून त्यांचे विविध विषयावर प्रबोधन केले जाते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पदयात्रेकरूंच्या वतीने इलियास फर्नाडिस, फादर थॉमस फर्नांडिस, बेनी डिसोजा, जोसेफ पॉल यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या सामाजिक बांधिलकीचे आभार मानले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी 'प्रथम राष्ट्र' या जनजागरण अभियानाबाबत मार्गदर्शन करताना राष्ट्र प्रथम का असले पाहिजे आणि देशसेवा का करावी याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, डॉ विशाल पाटील, भार्गवराम शिरोडकर, भगवान रेडकर, आनंद मेस्त्री, संतोष नाईक विनय वाडकर, दीपक गावकर, नितीन गोंडगिरे, सिद्धेश मणेरीकर उपस्थित होते.

error: Content is protected !!