सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काॅन्ग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार व कुटुंबियांनी पारंपरीक कौटुंबिक दिवाळी पाडवा संपन्न झाल्यावर अस्सल मालवणी भोजनाचा आस्वाद घेतला.
दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बारामती येथील गोविंदबाग येथील श्री शरद पवार व कुटुंबियांच्या निवासस्थानी ही विशेष अस्सल मालवणी मेजवानी आयोजीत करण्यात येते. श्री उदय वायंगणकर व कुटुंबिय, श्री. व्हिक्टर डांटस, श्री. प्रमोद चिंदरकर, श्री. व्यंकटेश पै या मंडळीच्या वतीने या आयोजीत मेजवानीत अस्सल मालवणी मसाले, ताजे मासे, मालवणचे पेयजल वगैरे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नेऊन हा स्वयंपाक रांधला जातो हे या विशेष मेजवानीचे वैशिष्ट्य आहे.
यावेळी श्री शरदचंद्र पवार यांच्यासह उदय वायंगणकर व कुटुंबिय, व्हिक्टर डांटस, प्रमोद चिंदरकर, व्यंकटेश पै व अन्य उपस्थित होते.