मुंबई | प्रतिनिधी : आपले संपूर्ण आयुष्य ‘सेवा हेच जीवन’ हे ब्रीदवाक्य समजून रुग्णांची सेवा करणार्या मालवणस्थित डाॅ सुभाष दिघे यांची जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब चे आजीव सदस्य व सल्लागार ज्येष्ठ रंगकर्मी श्री गिरीधर पुजारे यांनी मुंबई येथे भेट घेतली. ‘गगन सदन तेजोमयी संस्थेच्या ‘ध्यास सन्मान’ पुरस्कार वितरण कार्यक्रमात डाॅ सुभाष दिघे यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. डाॅ. मालवणचे यांना ध्यास सन्मान पुरस्कार मिळाल्याबद्दल गिरीधर पुजारे यांनी विशेष अभिनंदन केले.
आपल्या मालवण तालुक्यातील सेवाभावी व्यक्तिमत्वाची भेट घेऊन चर्चा करता आली याचे समाधान आहे अशी भावना जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, पळसंब चे मुंबईस्थित ज्येष्ठ सदस्य श्री गिरीधर पुजारे यांनी व्यक्त केली.