आमदार वैभव नाईक यांच्या प्रेरणेने घेतली हाती मशाल.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील युवकांनी माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मशाल हाती घेतली. आमदार वैभव नाईक यांच्या प्रेरणेने त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, माजी उपजिल्हा प्रमुख संतोष सावंत, विनोद सांडव, संदीप लाड, अमोल भोगले उपस्थित होते.
प्रवेश केलेले कार्यकर्ते हर्षद परब, सागर वराडकर, भारती वाघ, भाग्यश्री लाकडे, रेणुका लाड, मनुजा वारंग, कुणाल धुरत, सिद्धेश घोगळे यांना माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर यांनी शिवबंधन बांधले.