सिंधुदुर्ग, मसुरे व मालवण सह संपूर्ण महाराष्ट्रातून होत आहे अभिनंदन.
मसुरे | प्रतिनिधी : प्राध्यापक सुभाष फाटक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओरस या संस्थेच्या विश्वस्त पदी मसुरे गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक डॉक्टर श्रीकृष्ण उर्फ दीपक मुळीक परब यांची नुकतीच निवड झाली आहे. याबाबतचे लेखी पत्र व्यवस्थापकीय विश्वस्त योगेश तावडे यांनी डॉक्टर दीपक मुळीक परब यांना दिले आहे. उद्योग क्षेत्राबरोबरच डॉक्टर दीपक मुळीक परब यांचे शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान असून मसुरे एज्युकेशन सोसायटी मुंबई या संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
महाराष्ट्रामधील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांचे योगदान बहुमूल्य असं आहे. आपल्या निवडीबद्दल उद्योजक डॉक्टर दीपक मुळीक परब यांनी या संस्थेचे आभार मानले असून येणाऱ्या काळामध्ये या संस्थेचे नाव उज्वल करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू असे बोलताना सांगितले. त्यांच्या या निवडीबद्दल मसुरे, मुंबई व मालवण भागातून अभिनंदन होत आहे.