संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांच्या प्रयत्नांची मुंबईत आमदार कालिदास कोळंबकर व मान्यवरांनी केली प्रशंसा.
मसुरे | प्रतिनिधी : रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद चा मेळावा मुंबई दादर येथे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार कालिदास कोळंबकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाल. यावेळी संपूर्ण कोकणा मधून मुंबईकर चाकरमानी कोकणातील विकासात्मक प्रश्नांबाबत चर्चा विनिमय करण्यासाठी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस श्रीकांत सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सुरवातीला सर्व पाहुण्यांचे व उपस्थित कोकण वासीयांचे श्रीकांत सावंत यांनी स्वागत केले. या वेळी बोलताना श्रीकांत सावंत म्हणालेत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत त्वरित विलीनीकरण होणे आवश्यक आहे, गोवा महामार्ग त्वरित पूर्ण झालाच पाहिजे, कोकणच्या पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने बोट वाहतूक पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. तसेच कोकणातील सर्वच बंदरांचा मांडवा बंदरा प्रमाणे विकास होणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे रोजगार निर्माण होतील. कोकण वासियांना रोजगाराच्या संध्या उपलब्ध करून देणे यासाठी आपण सर्वांनी पाठपुरावा करणे आज गरजेचे आहे.
तसेच प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज निर्माण करून त्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले गेले पाहिजे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारणा होतील आणि तळागाळातील मुले डॉक्टर होतील.
यावेळी बोलताना आमदार कालिदास कोळंबकर म्हणालेत कोकणच्या विकासाच्या दृष्टीने ज्या ज्या मंत्र्यांना भेटणे आवश्यक आहे तेथे मी स्वतः तुमच्या बरोबर सोबत आहे. कोकणचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने काम करूया. कोकणच्या विकासासाठी या संस्थेच्या मागे आपण खंबीरपणे उभे आहोत. अशक्य कोणतेच काम नसते मी प्रत्येक गोष्ट यशस्वी करूनच दाखवतो. श्रीकांत सावंत यांचे कार्य सुद्धा महान असून कोकणच्या विकासाला चालना देणारे त्यांचे विचार आपण सर्वांनी पुढे घेऊन जाऊया. या वेळी शिवसेना वडाळा विधानसभा क्षेत्र प्रमुख विलास राणे ,माजी नगरसेवक सुनील मोरे,मुकुंद पडियाल,नामदेव मठकर निवृत्त सुप्रिटेंड जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग जिल्हा,ऍड योगिता सावंत,पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते प्रकाश कदम,उद्योजक चंद्रकांत कडव,राजन भगवान कदम,सुनील राजन कदम,महेश भालचंद्र कदम, रघुनाथ लाड राजापूर,विजय यशवंत धोत्रे ,विजय पांचाल, पुनाजी सिताराम गुरव, मनोहर गावडे , सविता बिराजदार , गणेश चमणकर तसेच कोकणातील अनेक संस्थांचे कार्यकर्ते, संस्थेचे सभासद कोकणवासीय चाकरमानी उपस्थित होते. विविध मान्यवरांनी कोकणातील अनेक समस्यांबाबत आपले विचार मांडलेत.
सर्व मान्यवरांचे आभार नामदेव मठकर यांनी मानले.