मालवण |
मालवणची ग्रामदेवता श्री देवी सातेरीचाजत्रोत्सव १२ ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात देवीची पूजाअर्चा, विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून ओटी भरण्यास सुरुवात होणार आहे. तरी भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.