26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

कासार्डे येथे माजी आमदार श्री. प्रमोद जठार यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा सहसंयोजक, सिंधुरत्न समृध्दी समिती सदस्य तथा माजी आमदार श्री. प्रमोद जठार यांचा ५९ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा त्यांच्या कासार्डेतील निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, हितचिंतक यानी उपस्थित राहून श्री. प्रमोद जठार यांना शुभेच्छा दिल्या.

देशाच्या सीमेवर जे जवान काम करत आहेत त्याच्या आणि आपल्या सर्वाच्या आयुष्यात असेच वाढदिवस यावेत. सुख समृद्धी येवून कोकणच्या विकासाची भरभराट होवूदे अशी आपण प्रार्थना करतो असे मनोगत त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केले.

या अभिष्टचिंतन सोहळ्याला केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी – सिंधुदुर्गचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. नारायण राणे याच्या प्रमुख उपस्थितीत प्रमोद जठार याच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी श्री. जठार यांच्या पत्नी सौ. नीरजा जठार, सौ निलम राणे,आमदार नितेश राणे,अभिषेक जठार, आदित्य जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, डाॅ.मिलिंद कुलकर्णी, कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल, भाजपा महिला प्रदेश सदस्या दिपलक्ष्मी पडते, प्रमोद जठार मित्रमंडळ अध्यक्ष प्रसाद जाधव, शिडवणे सरपंच रविंद्र शेटये, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, मानसी वाळवे याच्यासह, प्रमोद जठार मित्रमंडळ, रत्नागिरी – सिंधुदुर्ग येथील भाजपा पदाधिकाऱ्यांसह प्रमोद जठार प्रेमी उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे म्हणालेकी प्रमोद जठार यांचा आजचा शुभदिवस माझाही शुभदिवस आहे. प्रमोद जठार याना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य व त्याच्या मनातील मनोकामना पूर्ण करो अशी प्रार्थना मी माझ्या श्री देव रामेश्वराकडे करतो. आजच्या वाढदिवसाबरोबर पुढील पंचाहत्तर व शंभराव्या वाढदिवसाला मला बोलवतील असे सांगत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमोद जठार मित्रमंडळाच्या वतीने प्रमोद जठार यांच्या वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी सकाळपासूनच रत्नागिरी- सिंधुदुर्ग येथिल भाजपा पदाधिकाऱ्यांसह सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, शैक्षणिक, पत्रकार व प्रमोद जठार प्रेमी यांनी उपस्थित राहत पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त स्नेहभोजनाचा आस्वाद उपस्थितांनी घेत कलारंजन मुंबई निर्मित ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

( फोटो : श्री. अनिकेत जामसांडेकर )

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा सहसंयोजक, सिंधुरत्न समृध्दी समिती सदस्य तथा माजी आमदार श्री. प्रमोद जठार यांचा ५९ वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा त्यांच्या कासार्डेतील निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी, हितचिंतक यानी उपस्थित राहून श्री. प्रमोद जठार यांना शुभेच्छा दिल्या.

देशाच्या सीमेवर जे जवान काम करत आहेत त्याच्या आणि आपल्या सर्वाच्या आयुष्यात असेच वाढदिवस यावेत. सुख समृद्धी येवून कोकणच्या विकासाची भरभराट होवूदे अशी आपण प्रार्थना करतो असे मनोगत त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केले.

या अभिष्टचिंतन सोहळ्याला केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी - सिंधुदुर्गचे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. नारायण राणे याच्या प्रमुख उपस्थितीत प्रमोद जठार याच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी श्री. जठार यांच्या पत्नी सौ. नीरजा जठार, सौ निलम राणे,आमदार नितेश राणे,अभिषेक जठार, आदित्य जठार, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगांवकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, डाॅ.मिलिंद कुलकर्णी, कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल, भाजपा महिला प्रदेश सदस्या दिपलक्ष्मी पडते, प्रमोद जठार मित्रमंडळ अध्यक्ष प्रसाद जाधव, शिडवणे सरपंच रविंद्र शेटये, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, मानसी वाळवे याच्यासह, प्रमोद जठार मित्रमंडळ, रत्नागिरी - सिंधुदुर्ग येथील भाजपा पदाधिकाऱ्यांसह प्रमोद जठार प्रेमी उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे म्हणालेकी प्रमोद जठार यांचा आजचा शुभदिवस माझाही शुभदिवस आहे. प्रमोद जठार याना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य व त्याच्या मनातील मनोकामना पूर्ण करो अशी प्रार्थना मी माझ्या श्री देव रामेश्वराकडे करतो. आजच्या वाढदिवसाबरोबर पुढील पंचाहत्तर व शंभराव्या वाढदिवसाला मला बोलवतील असे सांगत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमोद जठार मित्रमंडळाच्या वतीने प्रमोद जठार यांच्या वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळ्यात विशेष सत्कार करण्यात आला.

तत्पूर्वी सकाळपासूनच रत्नागिरी- सिंधुदुर्ग येथिल भाजपा पदाधिकाऱ्यांसह सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, शैक्षणिक, पत्रकार व प्रमोद जठार प्रेमी यांनी उपस्थित राहत पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त स्नेहभोजनाचा आस्वाद उपस्थितांनी घेत कलारंजन मुंबई निर्मित 'मराठी पाऊल पडते पुढे' हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

( फोटो : श्री. अनिकेत जामसांडेकर )

error: Content is protected !!