मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी येथील आंगणे कुटुंबियांच्या सुप्रसिद्ध आणि नवसाला पावणारी अशी जगभर किर्ती असलेल्या श्री देवी भराडी मातेचा जत्रोत्सव २ मार्च २०२४ ला संपन्न होत आहे. या जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर समस्त आंगणे कुटुंबियांच्या वतीने भाविक भक्तांसाठी विशेष आवाहन करण्यात आले आहे.

या उत्सवात संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी व आपला नवस फेडण्यासाठी आंगणेवाडीत येतात. या सर्व यात्रेकरूंची देवीच्या दर्शनाची सोय ९ रांगातून केलेली आहे. या रांगातून सर्वांना देवीचे व्यवस्थित दर्शन होणार आहे. आंगणेवाडी येणाऱ्या सर्व भाविकांनी देवीचे दर्शन प्रस्तावित केलेल्या रांगेतूनच घ्यावे आणि आंगणे कुटुंबीयांना सहकार्य करावे असे आवाहन आंगणे कुटुंबियांच्या वतीने देवस्थान मंडळ अध्यक्ष श्री भास्कर आंगणे यांनी केले आहे.